Wednesday, 24 September 2025

"जागर स्त्री शक्तीचा"  चौथे-पुष्प.. विषय-मैत्रीण...

"जागर स्त्री शक्तीचा" ही नऊ दिवसांची नऊ लेखाची लेखनमाला देवीचरणी अर्पण.... जय भवानी....
मैत्री तुझी नी माझी 
भेटायला कारण लागत नाही 
भेटलो नाही म्हणून अंतर वाढत नाही 
सुख दुःख वाटून घ्यायला सांगावं लागत नाही 
कारण मैत्री शिवाय आयुष्याला अर्थच उरत नाही....

असं हे अजून एक स्त्री चं अती सुंदर रूप, आणि नातं  म्हणजे मैत्रीण....
हे नातं आपण स्वतः निवडतो. जे आपल्याला रक्ताच्या  नात्यापेक्षा प्रिय असतं. दोन व्यक्तिमधील विश्वास, प्रामाणिकपणा आणि काळजी घेण्याची वृत्ती असलेले चं एकमेकांचे मित्र मैत्रीण होतात. हे नातं आपल्या खूप खूप जवळच आणि हक्कच वाटत ते तुटण्याची भीती आपल्याला कधीच वाटत नाही म्हणूनच आपण त्यात खूप  मनमोकळेपणे वावरतो. हे असं नातं असतं ज्यात आपण चुकलो, रागावलो तरी आपली मैत्रीण नेहमी आपल्या सोबत असते आणि आपल्याला समजून घेते हे जरी असं असलं तरी एखाद्याचा खूप सहवास झाला म्हणजे तो किंवा ती आपली मैत्रीण झाली असे अजिबात नसते खरे पाहता मैत्री आणि सहवास यातला अन्योन्याश्रय फारच थोडा आहे. वाढत्या सहवासासोबत मैत्रीभाव अधिक परिपक्व होत जातो यात शंकाच नाही परंतु सहवास वाढला की स्नेह उत्पन्न झालाच पाहिजे असे नाही. 
त्याच प्रमाणे प्रशंसा व मैत्रिभाव या दोन भिन्न गोष्टी आहेत आपलें चुकते पाऊल जी फिरविते व जाणारा तोल जी सावरते ती खरी मैत्रीण..
खरी मैत्रीण सूर्यासारखी असते जिच्या सानिध्यात असतांना पूर्ण प्रकाशात असल्याचा भरवसा वाटत असतो तिच्या साथीने वावगं काही करण्याची भीतीचं वाटते म्हणूनच सूर्याला मित्र म्हणतात. 

पण इतक्यात छान मैत्रीला आपण कधी कधी गाफिल राहतो विशेषतः सेटल झाल्यावर, लग्न झाल्यावर 
काल एका खूप जुन्या मैत्रिणीचा फोन आला, मला म्हणाली "आपली ती अमुक मैत्रीण सोडून गेली आपल्याला " मी सुन्न झाले पुढे म्हणाली "मी यासाठी फोन नाही केला पण उद्या जर मीच फोन नाही करू शकले तर?  काय भरवसा, तिचा तो प्रश्न अजून अस्वस्थ करतोय.. मैत्रीत आपणही चुकतो गाफिल राहतो मग होतात गैरसमज आणि होतात फिके दोस्तीचे रंग मैत्रीतलं हे निसटत वळण आपल्याला दिसत पण तरीही आपला पाय  घसरतो आणि मैत्रीचा खांद्यावरचा हात सुटतो 

दोस्ती अगर गुनाह है तो होने ना देना 
दोस्ती अगर खुदा है तो उसे खोने ना देना 
करते हो अगर दोस्ती किसीसे तो सच्चे दोस्त के आंखो में कभी आसू आने ना देना 

म्हणून बोला, वेळ निघून जाण्याआधीच एकमेकांना भेटा, हक्क गाजवण सोडा. गृहीत धरू नका. आजच वेळ द्या.बोला मनात ठेऊ नका चांगल्या कामासाठी भक्कम पाठिंबा द्या. आदर आणि सन्मान करा. ठाम विश्वास ठेवा. अकारण स्पर्धा करू नका. अधिकार गाजवू नका
चुलतंय मग बोला 
या सर्व गोष्टी सांभाळा मग बघा मैत्रीण आयुष्यभराची सोबती होते आणि आयुष्य सोपं सोपं होत जात हे एक नातं तुमचं हक्काचं.. सर्वांच्या आयुष्यात असं सुंदर नातं नक्कीच असावं मैत्रीणीचं 
जय भवानी.... 🚩🙏
      अनामिका (PMJ)
✍️ सौ पुजा जहागीरदार

No comments:

Post a Comment