Friday 1 March 2024

*दर्शन रघुरायाचे....*🚩

*दर्शन रघुरायाचे....*🚩
गेल्या महिन्यात 22 जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, देशातील मोठे उद्योगपती, चित्रपट आणि क्रीडा जगतातील सेलिब्रिटींच्या उपस्थितीत पार पडला. तेव्हापासून जगभरातून लोक येथे दर्शनासाठी येत आहेत. तेव्हापासूनच अयोध्येत जाण्याची उत्सुकता होतीच.आणि लवकरच योग आला 26,27 फेब्रुवारी ला आम्ही अयोध्येत होतो.
उत्तर प्रदेशात प्रवेश करताच सर्वात प्रथम आम्ही प्रेमात पडलो ते "कुल्लड वाली चाय" च्या इतका सुंदर अप्रतिम चहा तो ही सगळीकडे चवीला सारखा फक्त इथेच ...सकाळच्या सुंदर सुरुवाती नंतर आम्ही फिरायला सुरुवात केली ..
सगळीकडे कडक, सुव्यवस्था शांतापूर्ण भक्तिमय अवस्था ....

घ्यायला प्रसाद प्रभूंचा, वानरसेना इथे सदा असते  सज्ज ....

नद्यांची आरती त्यातली संम्यक कृती, मनाला वेड लावते, त्या विविध घाटातील शांत लाटांची आकृती...

उंच अशी हनुमान गढी जेथून हनुमानजी रामकोटचे रक्षण करी.....

श्री राम मंदिर जे भव्य दिव्य मंदिर जिथे भावना व्यक्त करू शकत नाही.अशी जागा, जिथे आपल्याला आपल्या नशिबाचा अभिमान वाटतो अशी जागा. लोक तीर्थक्षेत्री का जातात याचं उत्तर जिथे मिळतं ती जागा..पाच मंडप पार केल्यावर येतो तो अद्भुत क्षण त्या सुंदर बालरूपातील प्रभु श्री रामचंद्रांचे दर्शन आपल्याला होते  आपण निशब्ध्द होतो..त्या रामाला आपल्या आतल्या रामाचे दर्शन होते.भक्तीमय अंतःकरणाने आपण दोघे हात जोडून नमस्कार करतो. मुखातून एकच वाक्य बाहेर येत ...सर्वे भवन्तु सुखिनः ...

जिकडे पाहू तिकडे मंदिर नव्हे मंदिरांची जणू नगरीच...अयोध्या....
असामान्य अजेय सदा विजयी योध्दा ज्याची नगरी अयोध्या...
ना कुणी जिंकू शकेल युद्ध अशी श्री राम नगरी अयोध्या....  जय श्री राम... जय जय श्री राम...🚩

✍🏻पुजा मुंडले जहागीरदार.