Thursday 9 June 2016



गुज-गोष्टी
"वाट पाहून तुझी, मन व्याकूळ झाले,
एकदा तरी तू मनसोक्त भेटून जा रे ."
तो म्हणाला,"वेडे, अस हळवं नाही व्हावयाच,
कितीही भरून आले, तरी लगेच नाही कोसळायच. "
"चातकासारखी आतुरतेने तुझी वाट किती पाहू?
तुझ्यासाठी आसुसला जीव, सांग कसा तुला दाऊ ?
दुष्काळ,प्राणहानी,आत्महत्या अजून किती साहू ?
तुझ्याविना जीवन मुश्किल,आता अंत नको पाहू . "
मी नक्की येईन,माझं जीवनच आहे वहायला ,
पण तुला नको का माझी नेमकी किंमत कळायला?
नेहमी वेळेवर आलो तर लागशील मला टाळायला ,
वाट पाहून तरी शिकशील नियोजन पाळायला .
कमजोर नाही मी , केव्हाही कसाही कोसळायला,
पाषाणहृदयी हि नाही , तुला इतकं छळायला .
मलाही आवडेल रसिकतेने तुला अस सजवायला,
नाहू-माखू घालून सप्तरंगात नखशिखांत फुलवायला ."