Sunday 17 February 2019

खरी देशभक्ती कृतीने दिसावी।

खरी देशभक्ती कृतीने दिसावी।
मुखे वाच्यता भक्तीची त्या नसावी॥

दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद; संपूर्ण देश शोकसागरात; ठिकठिकाणी उत्स्फूत बंद; जगभरातून हल्ल्याचा निषेध; निवडणूका उधळण्याचे षड्यंत्र; घरभेद्यांचा बदोबंस्त करा; जशाच तसेच उत्तर हवे; अशा एक ना अनेक बातम्या तुम्ही आम्ही सर्वच गेले दोन दिवसापासून वाचतोय.

तुम्ही आम्ही (जनसामान्य माणूस) या नंतर काय करतो? दोनचार facebook,Whatsapp वरच्या Post share/Fowarded करतो. भावपूर्ण श्रद्धांजली photos, videos send करतो. दोन चार दिवस आपला Dp निषेध म्हणून खुणवतो..
इतकचं काय तर खूप वाईट झालं म्हणून आपापसात चर्चासत्रही करतो. या पलिकडे आपल्या दिनचर्यात काही बदल होतो? किंवा बदल व्हावा का? असाही प्रश्न माझ्या प्रिय मित्रानां पडेल.

तर हो मित्रहो, आपण आपल्यात काही बदल करण्याची गरज आहे. खरी देशभक्ती सतत तेवत ठेवण्याची गरज आहे. देशभक्ती केवळ 15आॅगस्ट, 26जानेवारी साजरी करून; किंवा हल्ला झाल्यावर निषेध व्यक्त करून होत नाही ..मित्रहो मान्य आहे असं झाल्यावर राग येतो, चिड येते, संताप येतो. मलाही येतो नव्हे यायलाच हवा. त्या रागाच उत्तर आपण नक्कीच देऊ.. न्यूज मधे शहीद जवानांच्या त्या रडणार्या चिमुकल्या मुलाकडे पाहून रडू येण स्वाभाविक आहे, पण म्हणून त्या जवानांच्या जागी आपण किंवा आपल्यातील कोणी लढायला जाऊ शकतो का? नाही ना? तर मग आपण काय करू शकतो, हे शोधल पाहीजे.

त्यासाठी सिमेवर जाऊन लढाईच करायला हवी अस नाही. किंवा आपल्याला व्यक्ती स्वातंत्र आहे म्हणून काहीही बोलावं; काहीही करावं अस अजिबात नाही. मुळात हे सगळं का होतय याची कारण शोधणं आणि आत्मपरीक्षण करण गरजेच आहे. आपण काय करू शकतो ज्याने माझ्या देशाची सेवा होईल हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला केला पाहीजे.

आपल्या लहान मुलानां श्रद्धांजलीचा अर्थच माहीत नसतो. तो आपण शिकवला पाहीजे; सांगितला पाहीजे.
1) घरी किंवा सार्वजनिक जागी कचरा करू नये.
2) देशाच्या सार्वजनीक मालमत्तेचे नुकसान करू नये.
3) आपापसात जात,धर्म,पंथ कोणत्याही कारणाने भांडू नये.
4) आपला आर्थीक व्यवहार चोख ठेवणे; कुठलीही वस्तु खरेदी केल्यास बिल घेणे.
5) कोणत्याही साामाजीक किंवा वैयक्तीक व्यवहारात बैमानी करू नये.
6) आपल्या नैसर्गीक साधनसंपत्तीचा योग्य व काटकसरीने वापर करावा.
7) कोणत्याही प्रकारचे प्रदुषण होणार नाही याची डोंळ्यात तेल घालून काळजी घ्यावी.

या किंवा अश्या सोप्या पद्धतीने आपण देशसेवा करू शकतो. असेच आपण आपल्या मुलांना शिकवले पाहीजे आणि तसेच आचरणही केले पाहीजे..
तर आणि तरच आपण मोठ्या प्रश्नांची उत्तरे शोधू शकतो. तरचं समाजात कोणत्याही प्रसंगी एकसंघ उभे राहू शकतो. नाहीतर नुसत्याच गप्पांनी काहीही होणार नाही..वेळ आहे कृती करायची..
म्हणतात ना, करावी कृती ना मुखें ती वदावी ।
चला तर मग कृती करूया...
देश घडवूया....देश वाचवू या.....