दुसरे पुष्प...
विषय - कन्या
लेक चैतन्याचे रूप,लेक अल्लड चांदणं
लेक रंगांचे शिंपण,लेक गंध हळवं मन
लेक म्हणजे मनाचा हळवा कोपरा....
लेक म्हणजे आनंदाचा अखंड झरा....
असं म्हणतात नशीबवान असतात ते लोक ज्यांच्या घरी कन्यारत्न जन्माला येते. पूर्वीच्या तुलनेत आता मुलीचे स्वागत घरोघरी मोठ्या आनंदाने केले जाते.
तिचा जन्म झाला की चिमुकल्या पावलांनी घराची शोभा वाढते. घरात लहान थोरांची वर्दळ वाढते. लक्ष्मीच्या पावलांनी लक्ष्मीच घरात आली असे वाटू लागते. हसण्याच्या किलकऱ्या घरात घुमू लागतात. तिच्या पायातल्या पैंजणाच्या आवाजाने घर हसू लागते.काठी टेकावणारी पंजी बालपणात हरवते. आजी आजोबा तर परत एकदा आपल्या मुलीच बालपणच जणू अनुभवतात.
आई आणि मुलीच नातं तर खूपच खास असत दोघी एकमेकींच्या मैत्रिणीचं जणू. बाबा मुलीचा नातं म्हणजे दोघांच्या आयुष्याचा हलवा कोपरा, या नात्याबद्दल लिहिणारा गहिवराला नाही तर सांगा. अशी ही मुलगी, कन्या, लेक, पोर, छकुली, सुता, पुत्री, तनुजा, तनया, पोरगी, छोकरी घराचं नंदनवन करते. सर्वाना जीव लावते आणि एक दिवस आईवडिलांच घर सोडून पुढच्या प्रवासाला निघून जाते दुसऱ्या कुळचा आधार होण्यासाठी. हो पण स्त्री ची ही भूमिका काही सोपी नसते तिला त्यात खूप अडचनींचा सामना करावा लागते. पण तिने जर इथे तिच्या संस्कृती व संस्काराचा योग्य वापर केला तर ती दुसऱ्या कुळचाही उद्धारच करते.सर्वांची साथ मिळाली तर ती अख्ख कुटुंब सुंदररित्या चालवते, उभ करते, अन घडवतेही.
आजचा काळ प्रगतीचा आहे त्यात मुली खूप शिकू लागल्यात आणि मुले मुली समानता आली. मुली आर्थिकरित्या सबळ झाल्यात पण संस्कृती जपण्याची व संस्कार करण्याची, कुटुंब घडवण्याची जबाबदारी अजूनही मुलीचीच असते. नव्हे ति ती छान पार पडू शकते ती शक्ती तिच्यात उपजत असते. पण आता असे काहीसे घडत नाही असे चित्र दिसू लागले आहे. त्यामुळे पुढची पिढी उत्तम नागरिक घडेल का? यात थोडी शंका निर्माण होत आहे.
कारण मुलींना आजकाल खूप शिकून स्वतःच्या पायावर उभे रहायचे असते. त्यात चुकीचे नाही ते असलेच पाहिजे पण या सर्वात मुलींचे वय 30 वर्ष होते, मग लग्न मग मुले यात सामाजिक, आर्थिक, मानसिक, शारीरिक घडी बिघडते आणि मग पुढील प्रवासात तिच्यासोबत सर्वांची खूप कसरत होते.
या सर्वातून खूप नवनवीन प्रश्न निर्माण होत आहेत याचा विचार आणि त्यावर कृती करण्याची जबाबदारी तरुण मुलींवर व त्यांच्या पालकांवर आहे
कारण समाज उभारणीच्या कामात लेकीची, मुलीची भूमिका खूप खूप महत्वाची आहे.
आई भवानी या सर्व मुलींना या स्पर्धेच्या युगात तारू दे योग्य मार्ग दे शक्ती दे....
जय भवानी 🙏🙏
अनामिका (PMJ)
✍️सौ. पुजा जहागीरदार.
No comments:
Post a Comment