शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा...
स्त्री-शक्तीच्या विविध रूपांना अभिवादन करून, जिथे जिथे तिची पूजा होते तिथे तिथे देवाचे अधिष्ठान असते हे शिकवणारी आपली संस्कृती आहे. ज्या संस्कारांत आपण वाढलो ती संस्कृती, ते संस्कार जपले गेले पाहिजेत व तसे वागण्याची बुद्धी तिने सर्वांना दिली पाहिजे हीच तिच्याकडे प्रार्थना! हेच उदिष्ट डोळ्यासमोर ठेऊन नऊ दिवस आपण स्त्रीच्या विविध रूपांची माहिती माझ्या छोट्याश्या लेखाच्या माध्यमातून वाचणार आहात..
"जागर स्त्री शक्तीचा" ही नऊ दिवसांची नऊ लेखाची लेखनमाला देवीचरणी अर्पण.... जय भवानी....
प्रथम पुष्प...
विषय - माता
न सांगता सर्व काही जाणते ती आई....
न मागता भरभरून देते ती आई..
आई म्हणजे आत्मा आणि ईश्वर यांचा संगम मायेची पाखरण करणारी स्त्री म्हणजे आई..
आई, माता, माय, ममता, जन्मदा, जन्मदात्री, माऊली, जननी, माई, मा, मायडी, आय आश्या कितीतरी नावानी संबोधली जाणारी ती आई..
जी जन्म देते ती जननी आई बनते. तिचे खरे प्रेम आणि पालन पोषण याची कशाचीही तुलना केली जाऊ शकत नाही.आपल्या आयुष्यातील ती एकमेव महिला जी कोणत्याही हेतूशिवाय आपल्यावर भरभरून प्रेम करते. आणि आपणच तिच्यासाठी सर्वस्व असतो. तीच आपल्याला जगण्याची खरी कला शिकवते. उत्तम आदर्श व्यक्ती घडवते.
कौसल्या, देवकी यशोदा, माता कुंती, मदालसा,अरुंधती, जिजामाता, हिरकणी, माँ शारदा उत्तम मातृत्वाचे असे कितीतरी उदाहरणे देता येतील
आई हे दुर्गेचे रूप आहे. आणि आई मायेचा सागर आहे. आईची महती शब्दात मावणारी नाही म्हणूनच कवी यशवंत आपल्या कवितेत "स्वामी तिन्ही जागाचा आईविना भिकारी" असं म्हणतात.तर प्रभू श्री रामचंद्रानी स्वर्णमयी लंकेपेक्षा आपली जन्मभूमी, मातृभूमी अयोध्या श्रेष्ठ आहे असे म्हटले आहे. म्हणजे जन्मभूमीची आईशी बरोबरी केली आहे ते म्हणतात.. " जननी जन्मभूमीश्च स्वर्गादापिगरियसी" याच विचारातून आपण आपल्या देशाला भारत माता असे म्हणत असू...
मातृत्व हा एक सुखद प्रवास आहे.मातृत्व हे स्त्रीला मिळालेलं सर्वश्रेष्ठ वरदान आहे.
आजच्या विज्ञानयुगातसुद्धा आईचं स्थान हे अढळ आहे. बाळाची आई ही मृदू हाक ऐकण्याएवढं सुख अजूनतरी कशा कशात नाही.
ही दैवी देणगी आपली उत्तम नागरिक घडविण्याची जबाबदारी समजू या आणि सर्व जिजाऊ होऊ या....
जय भवानी....भारत माता की जय 🚩
अनामिका (PMJ)
✍️सौ. पुजा जहागीरदार.
No comments:
Post a Comment