Tuesday, 20 September 2016

परिवर्तन
परिवर्तन परिवर्तन खरंच झालंय का हो आता ?
तप्त सूर्याला शांत लाल पाहतो का आपण आता?
घराच्या अंगणात सदा रांगोळी दिसते का हो आता ?
वाऱ्याची मंद झुळूक, पक्ष्यांची किलबिलाट कानी पडते का आता ? 
आपण खरंच बदलतोय का आता ? ।।१।।
एकमेकांना समजून घेणं घरात तरी जाणवत का ?
चिमण्या बाळानं आई म्हणावं, इतका वेळ तरी असतो का ?
रोजचं सजण राहू द्या, पण भांगात कुंकू तरी भरतो का ?
खरंच आपण बदलतोय का ? ।।२।।
म्हातारपणाची काठी म्हणून कधी कोणाची होऊ का ?
इतरांसाठी जगण सोडा, स्वतःसाठीतरी वेळ काढतो का ?
माणूस म्हणून जगतांना एवढा विचार करतो का ?
खरंच आपण बदलतोय का ? ।।३।।
सायंकाळी दिवे लागणीला चिमणी पाखर घराकडे वळतात का ?
रात्री आधीची संध्याकाळ, घरात राहून अनुभवतो का ?
सर्वांना सुखी ठेव म्हणून, मागणं मागायला, हात तरी जोडतो का ?
खरंच आपण बदलतोय का ? ।।४।।
मातृभाषेतून शिकतांना देखील तिचा विचार करतो का ?
मराठीतून बोलणाऱ्याला मात्र निरक्षरच समजतो ना ?
इतकं समोर असूनही आपण बदलतोय ना ?
खरंच आपण बदलतोय का ? ।।५।।
मराठी वर्ष , मराठी सण, कधीतरी आठवतो का ?
पण डिसेंबर महिन्यातील ३१ तारीख, कधीतरी विसरतो का ?
खरंच आपण कधीतरी कुठेतरी चुकतोय का ?
बदल परिवर्तन नियम निसर्गाचा 
म्हणून जून ते सोन हे खोट का ?
स्वार्थासाठी आपण निसर्ग नियम बदलतोय का ?
खरंच आपण बदलतोय का ? 
खरंच आपण बदलावं ?
खरंच आपण बदलावं ?
हो आपण बदलावं ...... पण 
पण जून ते सोन अन नव ते हवं म्हणत बदलावं ...... ।।६।।
पूजा मुंडले. (अनामिका) 


No comments:

Post a Comment