Wednesday, 31 August 2016

वाटे आयुष्यभर लहानच राहवे 
सगळं जग विसरून आईच्या कुशीत झोपावे
काळजी, चिंता, हे शब्दचं माहित नसावे
वाटे आयुष्यभर लहानच राहवे ....

संकट येताच बाबांजवळ जाणे
बाबांच्या आवाजाला थोडं दचकून अभ्यासाला बसावे
वाटे आयुष्यभर लहानच राहवे ....

आपली आवडती वस्तू न मागताच मिळवणे
वेळेचं काळाचं कसलंच बंधन नसणे
वाटे आयुष्यभर लहानच राहवे ....

वाटेल तेव्हा वाटेल तसं स्वच्छंदी जीवन जगणे
फुलपाखरांप्रमाणे सर्व दूर फिरावे
वाटे आयुष्यभर लहानच राहवे ....

कवच्या बाहेरील जग अजब आहे फार
ऐरावत रत्न थोर त्याला अंकुशाचा मार
म्हणून वाटे आयुष्यभर लहानच राहवे ....

सगळं जग विसरून आईच्या कुशीत झोपावे
वाटे आयुष्यभर लहानच राहवे ....

No comments:

Post a Comment