Monday, 15 August 2016

सहज आठवली कविता आजच्या दिवशी …..
काय आणि का घेते मी प्रतिज्ञा……?
काय आणि का घेते मी प्रतिज्ञा, फ़क्त शब्दांचे बुडबुडे
जाते का कधी लक्ष, आपले तिच्या अर्थाकडे ?
म्हणता भारत देश आमचा, आम्ही भाऊ भाऊ सारे
का मग दंगली करता, तुमच्या मातृप्रेमाचे पुकारे ?
अभिमानाने सांगता, की भारतावर आमुचे प्रेम अती
मग भ्रष्टाचार करुन, का करता देशाची अधोगती ?
म्हणता आम्ही असू प्रामाणिक सदैव भारतमातेशी
करूयाका विचार, आहोत का प्रामाणिक किमान स्वतःशी ?
म्हणतांना जीवापाड जपू आमची भारतीय संस्कृती
मग का हो दडून बसते मनावर परकीय संस्कृती ?
ही प्रतिज्ञा का मग समाजात पोरासोरांची
आमची म्हणून घेण्याइतकीच किंमत नव्हे तिची …
घ्यायचीच असेल प्रतिज्ञा तर मनापासून घ्या
अन ती पाळण्यासाठी जरा तिच्या अर्थाकडे लक्ष द्या
अन ती पाळण्यासाठी जरा तिच्या अर्थाकडे लक्ष द्या……
अनामिका  …

भारत माता कि जय !

No comments:

Post a Comment