Monday, 11 June 2018

पाऊस....

अवेळी अन् भान हरपून का येतोस रे ?
माणसं आठवणीत हरपून बसतात मग...
हा भानावर आणायला, विज येते कामी म्हणा...
पण काहीही म्हण मित्रा, भारी काम करतोस तु...

मनावरचे ताण, दु:ख स्वच्छ धूवून काढतोस खरा.
मलीनतेच जग मग, वाटत सुंदर जरा जरा.
का रे इतके दिवस, जीवाची लाही लाही करतोस तू
पण काहीही म्हण मित्रा, भारी काम करतोस तु...

तु एकदा आलास, की मग आम्ही जागे होतो.
खुप बरसु लागलास, की तुला शिव्या शापही देतो.
नाही तेव्हा तु यावस म्हणून यज्ञ, याग नाही नाही ते करतो.
पण काहीही म्हण मित्रा, भारी काम करतोस तु...

खर सांगु का मित्रा, तुझी काळजीच नाही करत आम्ही
तु इतके कष्ट घेवून, जीवन आणतोस आमच्यासाठी
पण आम्ही..साधी जमिन देत नाही तूला मुराण्यासाठी
SOORY म्हणायची देखील लाज वाटतेय मित्रा
पण काहीही म्हण मित्रा, भारी काम करतोस तु...

इतक असूनही.... तु तुझ काम करतोय ....
वेळा बदलून ,जागा बदलून ,कमी जास्त प्रमाणात
का होइना नेटाण आपलं काम करतोय
माणसाला आपली चूक कृतीतून सांगतोय ...
पण काहीही म्हण मित्रा, भारी काम करतोस तु...

माणसाला आपली चुक कळाली,आणि ती दुरूस्त झाली तरचं होईल सगळं बर...
नाहीतर परिणाम लवकरच दिसतील वरचे वर .....
म्हणून मित्रहो जागे व्हा ....
पाणी आडवा पाणी जिरवा .......
अनामिका (PMJ)

No comments:

Post a Comment