Friday, 15 May 2015

"मी"

"मी"
मी...
मी हसणारा, मी हसवणारा...
मी खेळणारा, मी खेळवणारा...
मी बोलणारा, अन बोलायेला लावणारा...
मनातल सगळ काही जाणणारा,
अन मनात घर करून राहणारा...
मी ....
स्वतःच दुखः न विसरणारा ...
डोळ्यात साचलेल्या आश्रुना, कधीही न पुसणारा...
फक्त मी आठवणींत शोधणारा...
अन कोणाच्याही नकळत खूप खूप रडणारा...
मी...
कोणालाही न कळणारा...
त्यांचात असून हि,
वेगळा असा राहणारा..
आठवणीत झुरणारा,
कुणीतरी परत येण्याची,
रोज वाट पाहणारा...
रोज वाट पाहणारा...
मी....
त्या समुद्राला पाहून अस वाटत,
कि त्यातच जाऊन रहाव...
लाटांन बरोबर मैत्री करून,
त्यांच्याच बरोबर फिरावं...
दिसला एखादा किनारा,
तर त्याला जाऊन धड्काव ...
अन त्या किनार्याला पाहून,
शांत पणे परतावं...
मावळता तो सूर्य, रोज जवळून पहाव..
काळोख्या राती,
ते टीम टीमते चांदणे पाहून हसावं...
वादळी पाऊसात,
बेचन झालले मन उफाणून शांत कराव...
अन कुणाच्यातरी शोधात जग भर...
एक लाट म्हणून फिरव...
खरच...
त्या समुद्राला पाहून अस वाटत,
कि त्यातच...
एक लाट म्हणून जगाव,
अन कोणाच्या हि नकळत,
त्यातच संपून जाव...
त्यातच संपून जाव...

No comments:

Post a Comment