Thursday, 4 April 2013

मनासारखे झाले....!!
सारं काही मनासारखं झाल्यावरही
अजून थोडस बाकी असतच
चारचौघांसोबत चालत असतांना
माझं पाऊल तेव्हढं पाठी असतच
सारं काही मनासारखं झाल्यावरही
अजून थोडस हवं असतच
थोडस ते मिळाल्यावरही
त्यातही डाव उजवं असतच
सारं काही मनासारखं झाल्यावरही
मागणी मनाची कमी होत नाही
हव हवं ते मिळाल्यावरही
काही न मागण्याची हमी ते देत नाही
सारं काही मनासारखं झाल्यावरही
बरच काही असतं उरलेलं
एक गोष्ट मनासारखी झाली की
दुसरी गोष्ट मागायचं ठरलेलं
सारं काही मनासारखं झाल्यावरही
कशाचीतरी मनात खंत असते
मानवी मनाची ईच्छा आकांक्षा
सागरासारखी अनंत असते
सारं काही मनासारखंच घडत असतं
पंख लाऊन मनही ऊडत असतं
अडथळ्यांमुळे ते धडपडत असतं
तरीही मोहावरच ते जडतं असतं

No comments:

Post a Comment